तू जहाँ जहाँ चलेगा, मेरा साया साथ होगा – GNSS/GPS उपग्रहांची प्रेमकथा
प्रस्तावना कधीकाळी, काही फार वर्षांपूर्वी नाही, एखादे नवीन ठिकाण शोधायचे म्हणजे, रस्त्यावर कोणालातरी विचारावे लागायचे. मग त्यांच्या हातवाऱ्याइतकेच त्यांच्या आत्मविश्वासाचेही वाचन करावे लागायचे. कारण तुम्हाला माहीतच आहे. लोकांना तुम्हाला भलत्या दिशेला पाठवणे चालते पण "माहित नाही” म्हणणे चालत नाही. आपण पण नेमके अशाच व्यक्तीला पत्ता विचारतो जो कि त्या [...]